जैतापूर प्रकल्पाचे शंका निरसन

जैतापूर येथे होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिक लोकांच्या मनात प्रश्नांचे काहुर होते. शेतीचे काय होईल, त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल असे एक ना अनेक प्रश्नांनी भेडसावले होते. त्यातच विकरणाच्या होणाऱ्या परिणामाबाबत होणाऱ्या उलट सुलट चर्चा कानावर आल्या की काय खरे आणि काय खोटे कळेनासे झाले. या सर्व प्रश्नांनी सत्यता कळावी आणि तज्ज्ञांकडूनच या प्रश्नांची उत्तरे लोकांना थेट मिळावी यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्य शासन आणि अणुऊर्जा आयोगातर्फे संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. या खुल्या चर्चासत्रात लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष श्रीकुमार बॅनर्जी, माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र बडवे. डॉ. शरद काळे यांनी अतिशय सोप्या भाषेत आणि शास्त्रशुद्ध माहिती देऊन लोकांच्या शंकाचे निरसन केले.

१) या प्रकल्पासाठी लागणारे अणुइंधन आपल्याकडे पुरेसे आहे का? अमेरिकेत उभारलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाने अणु कचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. आणि या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. जैतापूरच्या बाबतीतही असे होणार नाही कशावरून? असे होऊ नये म्हणून भारतात अणुऊर्जा प्रकल्पामध्ये काय काळजी घेतली जाते?

कोळसा, पाणी, जैविक इंधन या कोणत्याही प्रकारे वीजनिर्मिती करण्याचे ठरविले तरी भविष्यात या स्त्रोतांचा साठा कमी होत जाणार आणि त्यामुळे या इंधनाचा प्रश्न बिकट होणार ही गोष्ट खरी असली तरी इतर स्त्रोताच्या मानाने अणुइंधनाच्या बाबतीत परिस्थिती नक्कीच चांगली आहे. २०१० च्या अहवालानुसार अणुइंधानाच्या बाबतीत परिस्थिती नक्कीच चांगली आहे.

अमेरिकेबाबत बोलायचे तर सुरुवातीला अमेरिकेने रिअ‍ॅक्टर उभारताना पुनर्चक्रांकन आणि पुनर्प्रक्रीयेची सोय केली नसल्याने तिथे त्यांनी त्याचे साठे करुन ठेवले. त्यामुळे अमेरिकेमध्ये अणुकचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पण भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्पामध्ये पुनर्चक्रांकन आणि पुनर्पक्रीयेची सोय केलेली असते. या पुनर्चक्रांकन केलेल्या इंधनातून ६० ते ७०% वीज मिळते. आणि अणुकचरा अतिशय कमी प्रमाणात होतो. त्यामुळे अमेरिकेप्रमाणे भारतात अणुकचऱ्याचा साठा होण्याची शक्यता नाही.

२) एकाच ठिकाणी सहा अणुभट्ट्या जगात कुठेही नाहीत. मग जैतापूरच्याच बाबतीत असं का? यामुळे धोका वाढतो असे नाही वाटत का?
एकाच ठिकाणी सहा अणुभट्ट्या कार्यरत असणे काही नवीन नाही. फ्रान्स, जर्मनी, जपानमध्ये अशा प्रकारच्या अणुभट्ट्या कार्यरत आहेत. बाहेरच्या देशाचे कशाला राजस्थानमध्येच आता एका ठिकाणी आठ रिअ‍ॅक्टर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. १६५० मेगावॅटच्या अणुभट्ट्या उभारणे म्हणजे आपण काही वेगळ काय करत आहोत अशातला भाग नाही. फ्रान्स, जर्मनी, जपानमध्ये १२००, १४०० मेगावॅटच्या अणुभट्ट्या कार्यरत आहेत. जपानमध्ये एकाच ठिकाणी सात अणुभट्ट्या उभारल्या आहेत आणि त्या कार्यरत आहेत.

३) जैतापूर प्रकल्पाला मान्यत देताना पर्यावरण विभागाने ३५ अटी घातल्या आहेत त्याची पूर्तता करण्यात येईल का?जैतापूर प्रकल्पाच्या उभारणीला मान्यता देताना पर्यावरण विभागाने घातलेल्या अटीचे तंतोतंत पालन करण्यात येईल. कोकणाला असुरक्षित बनवेल असा कोणताही प्रकल्प उभारता जाणार नाही. या अटीचे पालन होते की नाही याची खात्री अणुऊर्जा आयोग वेळोवेळी करेल.

४) काही संशोधकांच्या सर्व अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळ राहणाऱ्या लोकांमध्ये शारिरिक विकलांगतेचे प्रमाण वाटते? काहीच्या मते विकीरणामुळे मोठ्या तोंडाची मुल जन्माला येतात. लोकांमध्ये नपुंसकता येते आणि कॅन्सर होतो. हे खरे आहे का?
जन्मतः शारीरिक विकलांगता असण्याची टक्केवारी .१ आहे. ती तशी सगळीकडे असते. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पामुळे ती होते आहे म्हणता येणार नाही. शिवाय या तथाकथित संशोधकांनी त्याचे संशोधन प्रसिद्ध केले नाही. त्यामुळे नुसत्या ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. रत्नागिरी, गोवा आणि सिंधुदुर्ग या परिसरात टाटा हॉस्पिटलतर्फे गेली पाच वर्षे कॅन्सर संबंधी डॉक्युमेटेशन करायला सुरूवात झाली आहे. सध्या हाती असलेल्या नॅचरल सँम्पलिंगच्या अहवालानुसार गोवा ३६ प्रतिलक्ष, रत्नागिरी २८, आणि सिंधुदुर्ग २६ आहे. अणुऊर्जा प्रकल्पानंतर यात अचानक मोठी वाढ होते का त्यावरुन काही निष्कर्ष निघू शकेल. अणूऊर्जा प्रकल्पामध्ये स्त्रीयाही काम करतात त्या गर्भवती असतांनाही त्या काम करतात पण त्याचा त्यांच्या मुलांवर काही परिणाम झालेला नाही. अणुऊर्जा प्रकल्पाजवळ राहणाऱ्या लोकांमध्ये शारिरिक विकलांगला येते किंवा नपुसकतेचे प्रमाण वाढते अशा प्रकारचे निष्कर्ष आजपर्यंत हाती आले नाहीत.

५) जैतापूर प्रकल्पामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान १५ डि.से. ने वाढेल हे खरे का?
जीवाश्म इंधन जसे कोळसा, वायू, तेल इ. आणि जैविक इंधन यापासून निर्माण होणाऱ्या वाफेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्यामध्ये ऊर्जा कंडेन्सर मध्ये वाफेचे द्रवीभवन केले जाते आणि त्यासाठी थंड पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे, अणु स्त्रोतापासून विद्युत निर्मिती करताना देखील थंड पाणी लागते. इतर विद्युतीनिर्मिती तंत्रज्ञान, जसे कोळसा, वायू, तेल इ. यांच्या तुलनेमध्ये अणुऊर्जा आणि मोटार बोटी देखील त्यांची इंजीने थंड करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर करतात. यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे तपमान ऊर्जा प्रकल्पामधून बाहेर टाकल्या जाणाऱ्या थंड करण्याच्या प्रक्रियमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या तुलनेमध्ये बरेच जास्त असते.

जैतापूर प्रकल्पासाठी, एम ओ ई एफ ने त्याच्या अनुमतीमध्ये पाण्याच्या तापमानातील वाढ ५ अंश से. एवढीच मर्यादित केली आहे. पाण्याच्या बाहेर सोडण्यामुळे होणाऱ्या औष्णिक पर्यावरणातील परिणामाचे पैलू यावर विस्तृत प्रमाणावर शास्त्रीय अभ्यास केला गेला. एक चौरस किलो मीटरच्या केवळ एक चतुर्थांश एवढ्या अतिशय लहान भागामध्ये पाण्याचे तपमान सभोवतालच्या तापमानापेक्षा ५ अंश सें. ने वाढते आणि ते ही फक्त जेथे पाणी मिसळले जाईल त्या ठिकाणी. परिस्थितीला योग्य राखण्यासाठी जलसाठ्याच्या (समुद्राच्या) पूर्ण आकाराच्या मानाने फारच थोड्या क्षेत्रफळाची आवश्यकता असते. हे लक्षात घ्यावे की, मोठ्या प्रमाणावरील जलसाठ्याचे तापमान कायम समान राहते. अशाप्रकारे प्रकल्प स्थळाजवळील समुद्री जीवन व मासेमारी यावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही.

अणुऊर्जा प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तापमानासाठी पर्यावरण मंत्रालयाने काही निकष घालून दिले आहेत. या निकषांवरून जून्या प्रकल्पासाठी ७ अंश सें. तापमान निश्चित करण्यात आले आहे. जैतापूर प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे तापमान फक्त ५ अंश.सें ने वाढणार आहे. त्यामुळे १५ अंश सें ने तपमान वाढण्याचा प्रश्नच येत नाही.

६) माडबन, करेल, निवेली मिढगावणे आणि वरील पाडा या गावांचे स्थंलातर या प्रकल्पासाठी केले जाणार आहे का? ९३८ हे. पेक्षा जास्त जमीन भविष्यात लागू शकते का? तसेच प्रकल्पाच्या सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील मच्छीमारांना मासेमारीसाठी बंदी करण्यात येईल का?
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे कोणीही स्थलांतरित होणार नाही. प्रकल्पला लागणारी एकूण जमीन ९३८ हे. आहे. त्यापेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात येणार नाही. प्रकल्पाच्या सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील मासेमारीला प्रतिबंध केला जाणार नाही. प्रकल्पातून ५०० मी. पर्यंत संरक्षित क्षेत्र असले तरी पारंपरिक मासेमारीसाठी बंदरात येणे, जाणे, तसेच मासेमारी करणे यासाठी प्रतिबंध लावला जाणार नाही.

७) चीन, फिनलँड येथे उभारण्यात आलेल्या रिअ‍ॅक्टरच्या कामात दिरंगाई झाल्यामुळे प्रस्तावित किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट खर्च करावा लागला असा त्यांचा अनुभव आहे. मग जैतापूरचा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का? अरेवा कंपनीच्या रीअ‍ॅक्टरचा अग्राह का?
चीन फिनलँडमध्ये अणुभट्ट्या उभारतांना अधिक कालावधी लागला हे खरे आहे पण ही वेळ तांत्रिक कारणाने लागला नाही तर रेग्युलेटरी किलरन्स, डिझाईन वगैरे कारणांमुळे झाला आहे. असे भारतात होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. अरेवा कंपनीचेच रिअ‍ॅक्टर घेतले पाहिजे असे आपल्यावर बंधन नाही पण अरेवा कंपनी ही फ्रान्स सरकारची कंपनी आहे त्यामुळे कोणत्याही खाजगी कंपनीपेक्षा ती अधिक विश्वासार्ह आहे. जैतापूर येथे उभारण्यात येणाऱ्या अणुभट्ट्या १६५० मेगावॅट क्षमतेच्या इपीआर ( युरापीयन प्रेशटाईज्ड रिअ‍ॅक्टर) असून त्याना अरेवा कंपनीनेच विकसित केले आहे. सद्यपरिस्थितीत अणुभट्ट्यांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. यासर्व दृष्टीने इपीआर रीअ‍ॅक्टर परिपूर्ण इपीआर रीअ‍ॅक्टर फ्रेंच एन ४ (चुझ व सिव्हॉक्स १ व २ येथे कार्यन्वित) आणि जर्मन कॉनव्हॉय (C.O.N.V.O.Y.0) (वेकार्वहेल्थम, इजार, व एम्स्लँड येथे कार्यन्वीत) यापासून निर्माण केले आहे. आणि त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. ई.पी.आर. च्या संरचनेमध्ये फ्रेंच व इतर कार्यात पी.क्यु.आर च्या प्रचालणीय अनुभवाचा उपयोग केला असून आधुनिक सुरक्षा तत्त्वांचा अधिकार केला आहे. म्हणून आपण अरेवा कंपनीच्या इ.पी.आर. संरचना स्वीकारण्याचे ठरवले आहे.

८) प्रकल्पामधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सारामुळे, पिके, फळझाडे, भाजीपाला वगैरे सह आजूबाजूच्या पर्यावरणावर परिणाम होईल का?
अणुऊर्जा प्रकल्पामधून बाहेर पडणारा किरणोत्सार अतिशय कमी आणि नैसर्गिक परिस्थितीतील किरणोत्साराहून विलग व करण्यासारखा असतो. परंतु भरपूर काळजी म्हणून, प्रकल्पाच्या आजूबाजूच्या ३० कि.मी. च्या क्षेत्रामधील पर्यावरणातील घटक जसे हवा, पाणी, माती, झाडे, पिके, मासे, दूध इ. चे सतत निरिक्षण केले जाते आणि त्याची प्रकल्पाच्या पूर्ण होण्याच्या आधी स्थित केलेल्या आधारभूत डेटा बरोबर तुलना केली जाते. देशातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाजवळील पर्यावरणातील घटकांचे स्तत निरिक्षणामध्ये, आजपर्यंत आधारभूत डेटा पेक्षा जास्त बदल दाखवला नाही.

९) जमीनीच्या अधिग्रहणामुळे आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थापन केल्यामुळे प्रकल्पबाधीत लोकांच्या (पीए‍एफ) जीवन शैलीवर विपरित परिणाम होईल का?
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीमुळे प्रमाणित केलेल्या नियमांनुसार प्रकल्प बाधित कुटुंबाना प्राधान्य देताना, सुयोग्य व्यक्तींसाठी थेट नियुक्ती निर्माण होईल. निर्माणाच्या वेळेस आणि तदपश्चातच्या कार्याच्या दरम्यान आजूबाजूच्या प्रदेशातील कित्येक लोकांना देखील रोजगार उपलब्ध होईल. त्याचबरोबर, कच्च्या मालाचा पुरवठा, प्रकल्पातील लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुविधा उपलब्ध करताना, कंत्राटे देताना उद्योगाची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे, ज्याप्रकारे देशातील इतर अणुऊर्जा प्रकल्प स्थळांच्या बाबतीत झाली त्याप्रकारे जवळच्या प्रदेशातील लोकांची आर्थिक भरभराट होईल, असे लक्षात घेतले की जैतापूर स्थळाचे अणु उद्यान १०,००० मेगा वॉटचे आहे. प्रत्येकी १६५० मेगा वॉटची ६ इ.पी.आर युनिटे आतापासून प्रत्येक टप्प्यात २ युनिटे बांधकाम पद्धतीने पायरी पायरीने बांधावयास सुरु होतील आणि त्यांचे प्रचालनाचे कार्य पुढील ६० वर्षे चालू राहणार असेल तर यामुळे स्थानिक जनतेला बऱ्याच कालवधीसाठी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल.

पुनर्वसन आणि पुनर्विकास – प्रकल्पबाधीत कुटुंबासाठी आर व आर चा करार एनपीसीआयएल आणि महाराष्ट्र राज्य सरकार यामध्ये झाला आहे. जमीन प्राप्ती बदलच्या आधीच्या दिल्या गेलेल्या भरपाई व्यतिरिक्त, त्यामध्ये ताब्यात घेतलेली जमीन व मालमत्ता वाढीव भरपाई जमीन मालकांच्या प्रतिनिधीची समिती व एनपीसीआयएल द्वारा विचारात घेतले जाईल. एका विस्तृत योजनेअंतर्गत प्रभावित गावांमधील सार्वजनिक सुविधांचे बांधकाम, सुधारणा आणि काळजी यांकडे लक्ष दिले जाई. रोजगाराची उपलब्धता / रोजगाराच्या अभावाच्या वेळी एक वेळेची भरपाई, कंत्राटामध्ये प्रकल्प बाधीत (पीएपी) व्यक्तींना प्राधान्य, योग्य प्रशिक्षणाची सोय, पुनर्वसनाच्या भत्त्याची सोय आणि निराधार व्यक्तींना निवृत्ती वेतन देण्याकडे लक्ष पुरवले जाणार आहे.