जळगाव जिल्हा

पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा होय. सखाराम महाराजांच्या समाधीमुळे व तत्त्वज्ञान मंदिरामुळे एक संतपीठ ठरलेले अमळनेर; पर्शियन भाषेतील शिलालेख व पांडववाडा यांमुळे ऐतिहासिक ठरलेले एरंडोल; यादवकालीन शिल्पांमुळे महत्त्व प्राप्त झालेले पाटण व कॉंग्रसच्या ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे (१९३६) आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले फैजपूर ही गावे या जिल्ह्याची आभूषणे होत.
‘मृत्यूचे चुंबण घेणारा महाकवी’ या शब्दात आचार्य अत्रे यांनी ज्यांचे वर्णन केले, त्या सानेगुरुजीम्च्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण याच जिल्ह्यात झाली. येथेच त्यांचे कार्य-कर्तृत्व फुलले. बालकवी ठोंबरे, अहिराणी बोलीत रसाळ व प्रासादिक काव्यरचना करणाऱ्या ‘निसर्गकन्या’ बहिणाबाई चौधरी ह्या या मातीने महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या होत.

2 thoughts on “जळगाव जिल्हा

  1. Pingback: फरकांडा | Pharkanda

  2. Pingback: बहिणाबाई चौधरी | Bahinabai Chaudhari

Comments are closed.