जाळीची साबुदाणा पापडी

साहित्य :

  • साबुदाणा एक वाटी
  • जरुरीप्रमाणे रिफाईंड तेल
  • मीठ
  • पाणी

कृती :

साबुदाणा चार/पाच तास भिजत ठेवा. भिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून कालवा. पाच से.मी. व्यास असलेली (किंवा स्वच्छ पत्र्याची लहानसर झाकणे) पत्र्याची झाकणे घ्या. त्याला वरून हलकासा तुपाचा हात लावा. या झाकणावर साबुदाणा पसरून घाला. इडलीपात्रात पाणी उकळायला ठेवा. त्यावर चाळणी ठेवा. आणि यावर साबुदाणा पसरून ठेवलेली झाकणे ठेवा. चांगली वाफवून घ्या. साबुदाणा शिजला की या पापड्या सुईच्या साहाय्याने अलगद उचलून काढाव्यात थाळीत/ताटात चांगल्या वाळवून घ्याव्यात. चवीसाठी यात जिरे सुद्धा घालता येते. जरुरीप्रमाणे तळून खाव्यात. चांगल्या कुरकुरीत लागतात.