जेवणातील हानिकारक संयोग

 1. दुधाबरोबर : दही, मीठ, आंबट, चिंच, नारळ, मुळा किंवा त्याची पाने, तोरु, आंबट फळे, अपायकारक आहेत. दूधात मूळा टाकून घेऊ नये. याने दूध नासते. फणस व तेलाचे पदार्थ हे ही त्रासदायक आहेत.
 2. दही : दूध, खीर, पनीर, गरम जेवण केली किंवा केळ्याची भाजी, खरबूज किंवा मूळा घेऊ नये.
 3. तूपा बरोबर : गार दूध, गार पाणी आणि मध घेऊ नये.
 4. फणस : पान आणि फणस एकत्र अपायकारक आहे.
 5. मूळा : मूळा आणि गूळ एकत्र वापरू नये.
 6. गरम पाण्याबरोबर मध अपायकारक आहे.
 7. गार पाण्याचा बरोबर : शेंगदाणे, तूप , तेल, पेरु, काकडी, गरम दूध किंवा गरम जेवण घेऊ नये.
 8. चहा बरोबर : काकडी, थंड फळे, गार पाणी घेऊ नये.
 9. मासे : दूध, ऊसाचा रस, मध आणि पाण्या जवळ राहणाऱ्या पक्षांचे मांस या बरोबर खाऊ नये.
 10. मांस : मध किंवा पनीर याच्याबरोबर घेतल्याने पोट खराब होते.
 11. गरम जेवणाबरोबर : गार पाणी, किंवा कोणतीही खाण्यापिण्याची गार वस्तु गरम जेवणाबरोबर घेऊ नये.
 12. तांब्या : पितळ्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ जसे तूप, तेल, आंबट दही, ताक, दूध, लोणी, भाज्या वगैरे विषाक्त होतात. म्हणून असे पदार्थ खाऊ नये.