झटपट उडीदमेथी

साहित्य :

 • ५०० ग्रॅम मोठे बटाटे
 • २ वाट्या ओले खोबरे
 • ४ मोठे चमचे तेल
 • २ चमचे उडदाची डाळ
 • अर्धा चमचा मोहरी
 • पाव चमचा मेथी
 • पाव चमचा हिंग
 • पाव चमचा हळद
 • दीड चमचा मीठ
 • दीड चमचा तिखट (आवडीनुसार)
 • लिंबाएवढी चिंच
 • सजावटीसाठी कोथिंबीर

कृती :

चिंच तासभर भिजत टाकून नंतर कोळ काढावा. बटाट्याची साले काढून लांब चिप्ससारखे तुकडे चिरून पाण्यात ठेवावे. नारळ बारीक घ्यावा. मोठ्या पातेल्यात तेल तापलेकी त्यात उडदाची डाळ बदामीसर परतावी व मोहरी घालावी. मोहरी तडतडली की खाली उतरून मेथी व हिंग घालावा. लगेच बटाट्याचे तुकडे, हळद, तिखट, मीठ व तीन वाट्या गरम पाणी घालून पुन्हा चुलीवर ठेवावे. बटाटे शिजले की चिंचेचा कोळ घालावा व २-३ मिनिटे मंद उकळू द्यावे. नंतर वाटलेला नारळ घालावा. ढवळून पाच मिनिटे शिजवावे. वाढताना असल्यास थोडी कोथिंबीर घालावी व वाढावे.

भाताबरोबर किंवा पोळी-भाकरीबरोबर छान लागते.