जिलेबी

साहित्य :

 • १ फुलपात्र रवा
 • १ फुलपात्र मैदा
 • ३ टेबलस्पून आंबट दही
 • २ टे.स्पून पातळ डालडाचे मोहन
 • पाव वाटी डाळीचे पीठ
 • पीठ भिजवण्यासाठी कढत पाणी
 • ३ फुलपात्रे साखर
 • ३ फुलपात्रे पाणी
 • २ लिंबे
 • थोडा केशरी रंग
 • केशर.

कृती :

रवा, मैदा, दही डाळीचे पीठ व डालडा एकत्र करून कढत पाण्याने पीठ भिजवावे. भज्याच्या पिठापेक्षा जरा घट्ट असावे. पिठाची गुठळी राहू देऊ नव्हे. नंतर हे पीठ रात्रभर झाकून ठेवा.दुसऱ्या दिवशी साखरेत पाणी घालून पाक करावा. त्यात लिंबाचा रस घाला. लहान परातीत तूप घालून गॅसवर ठेवावे. पीठ खूप घोटून घ्या व जिलेबी करायच्या प्लॅस्टिकच्या बाटलीत भरावे. नंतर एका धारेने सावकाश जिलब्या घालाव्या, उलटाव्या व नंतर पाकात टाकाव्या.