जिर्‍यामिर्‍याची सौम्य डाळ

साहित्य :

 • १ वाटी तुरीची डाळ
 • २ वाट्या पाणी
 • १५० ग्रॅम (१०-१२) फरसबीच्या शेंगा किंवा तोंडली
 • ४ हिरव्या मिरच्या
 • अर्धा चमचा मिरी
 • अर्धा चमचा जिरे
 • १ चमचा मीठ (किंवा जास्त)

फोडणीसाठी :

 • ३ चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • पाव चमचा हिंग
 • अर्धा चमचा हळद
 • अर्ध्या लिंबाचा रस

कृती :

जिर्‍यामिर्‍याची सौम्य डाळ

जिर्‍यामिर्‍याची सौम्य डाळ

डाळ शिजत ठेवताना त्यात चिमूटभर हिंग, २ चिमट्या हळद, पाव चमचा तेल, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या व फरसबीच्या शेंगाचे तुकडे घालावेत.

वांगी किंवा तोंडली असल्यास देठ काढून टाकून मध्यम तुकडे करावेत व भाजी डाळीत घालून पूर्ण शिजवावी.

तव्यावर किंवा छोट्या कढईत वा पातेलीत पाव चमचा तेलावर जिरे व मिरे बदामी परतावे व त्याची पूड करावी.

शिजलेल्या दाळीत ही पूड व मीठ घालावे. तेलाची फोडणी करून (मोहरी, हिंग व हळद) डाळीवर ओतावी व डाळ खाली उतरवावी. लिंबाचा रस घालून लगेच वाढावी.

जिर्‍यामिर्‍याची सौम्य डाळ ही पथ्यासाठी किंवा आजार्‍यासाठी फार चांगली आहे.