जीवनफंडा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

जीवनफंडा

जीवनफंडा

प्रख्यात मॅनेजमेंट तज्ज्ञ, कॉर्पोरेट ट्रेनर व सिद्धहस्त लेखिका डॉ. स्वप्ना पाटकर यांनी ‘जीवनफंडा’ हे पुस्तक लिहिले आहे व याचे प्रकाशन प्रसिद्ध कलावंत स्वप्नील जोशी आणि मानसी नाईक यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
विधानपरिषदेचे विनोद तावडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

अमेय प्रकाशनाचे उल्हास लाटकर यांच्या तर्फे पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. क्रॉसवर्डचे शरण बिरादर हे कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित असतील.

वेळ:
शुक्रवार, दि. २९ जून २०१२ रोजी
सायं. ५.३० वा.

कार्यक्रमाचे स्थळ:
क्रॉसवर्ड, आयसीसी ट्रेड सेंटर,
सेनापती बापट मार्ग, पुणे-१६