१९ जुलै दिनविशेष

डॉ. जयंत विष्णू नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर

जागतिक दिवस

  • शहीद दिन : म्यानमार.
  • राष्ट्रीय मुक्ती दिन : निकाराग्वा.
  • राष्ट्राध्यक्ष दिन : बॉत्स्वाना.

ठळक घटना

  • १६९२ : अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली ५ स्त्रीयांना फाशी देण्यात आली.
  • १७६१ : माधवराव पेशवे यांना वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पेशवाईची वस्त्रे बहाल करण्यात आली.
  • १९१२ : अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
  • १९६९ : भारतीय चौदा मोठ्या बॅंकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • १९७६ : नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना.
  • १९८९ : युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.

जन्म

  • १५३१ : हिंदी भाषेतील श्रेष्ठ कवी व संत तुलसीदास यांचा जन्म.
  • १८१४ : सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.
  • १८३४ : एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.
  • १८७६ : जॉन गन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७७ : आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९४ : ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.
  • १८९६ : ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.
  • १९३४ : फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.
  • १९३८ : डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९४६ : इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.
  • १९५५ : रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मॄत्यु

  • ५१४ : पोप सिमाकस.
  • ९३१ : उडा, जपानी सम्राट.
  • १९४७ : ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
  • १९६५ : सिंगमन र्‍ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९८० : निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
  • २००४ : झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.