काबुली चणे

साहित्यः

 • ३ कप काबुली चणे
 • ३ मोठी विलायची
 • ४ छोटी विलायची
 • ४ लवंग
 • १ चमचा मीठ
 • १ तुकडे आले
 • १ चमचा खाण्याचा सोडा
 • १० कप पाणी

मसाल्यासाठीः

 • ४ छोटे चमचे आमचूर
 • ४ चमचे गरम मसाला
 • २ चमचे  काळी मिरी
 • १ चमचा मीठ
 • १ चमचे काळे मीठ
 • २ चमचे भाजून झालेले जीरे
 • ४ हिरव्या मिरच्या
 • २५० ग्रा. बटाटे
 • १ तुकडा आले
 • २ टमाटे

कृतीः

३ कप चणे, १० कप पाण्यामध्ये आले, मोठी विलायची, लवंग, दालचीनी, खायचा सोडा, मीठ टाकुन रात्रभर भिजू देणे. सकाळी कुकरमध्ये १ शिटी होईपर्यंत उकडावे व काढुन कढईत टाकावे नंतर चण्याचे उकडलेले पाणी यात टाकावे. हे पाणी शिजत राहते. चण्यावर सर्व वाटलेला मसाला पसरून देणे. तसेच थोडे पाणी टाकावे. बटाट्याच्या चार चार तुकड्यांना चण्यावर सजवावे, हिरवी मिरची उभी करून चण्यावर व गरम तेल टाकावे तसेच वाढतांना लिंबू पिळावा व कोथंबिर ने सजवावे.