कबूतर आणि कावळा

एका खुराडयातले एक कबूतर मोठया गर्वाने एका कावळ्यास म्हणाले, ‘अरे, माझे घर पहा कसे मुलाबाळांनी भरलेले आहे !’ कावळा उत्तर देतो, ‘असे जर असेल तर तुझ्या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटते. कारण पारतंत्र्यात दिवस घालविणाराला फार संतति असणे, याच्यासारखे दुर्दैव दुसरे नाही.’