कच्च्या केळ्याचे वडे

साहित्य :

  • ३ कच्ची केळी
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ इंच आले
  • १ कांदा
  • अर्धा चमचा तिखट
  • १ चमचा मीठ
  • २ ब्रेडच्या स्लाईसेस
  • तळण्यासाठी तेल किंवा तूप
  • अर्धा कप दूध

कृती :

कच्च्या केळ्याचे वडे

कच्च्या केळ्याचे वडे

केळी सालासकट उकडावी. सोलून पुरणयंत्रावर घालावी किंवा हाताने मळावी.

आले-मिरची एकत्र बारीक वाटावी. कांदा बारीक चिरावा. ब्रेडचे स्लाईस दुधात पाच-सात मिनिटे भिजवावे. घट्ट पिळून कुस्करावेत.

केळ्यात वाटलेली आले-मिरची, कांदा, ब्रेड, तिखट व मीठ घालून मळावे. या मिश्रणाचे छोटे वडे करून जरा चपटा आकार द्यावा व कढईत तेलात बदामीसर रंगावर तळावे.

नारळाच्या चटणीबरोबर किंवा दह्यातली चटणी, सॉसबरोबर हे वडे छान लागतात.

तळलेले वडे पाण्यात पांच-सात मिनिटे भिजवावे व हलक्या हाताने पिळून डिशमध्ये ठेवावेत.

त्यावर घुसळलेले दही घातल्यास व वरून जिरेपूड, मीठ व लाल तिखट भुरभुरल्यास वेगळ्या प्रकारचे दहीवडे होतात.