कडधान्याची कोशिंबीर

साहित्य :

  • ३० ग्रॅम मटकी
  • ३० ग्रॅम हिरवे मूग
  • ३० ग्रॅम हरभरे
  • अर्धी वाटी सोले खोबरे
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ लिंबू
  • दीड चमचा चवीनुसार मीठ
  • अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • अर्धा चमचा साखर

कृती :

मटकी व मूग आदल्या दिवशी सकाळी भिजत घालावे. रात्री फडक्यात बांधून ठेवावे. हरभरे रात्री भिजत घालावे. मोड आलेली मटकी, मूग व हरभरे वेगवेगळे शिजवून घ्यावे. गार झाले की पाणी काढून टाकावे.इतर जिन्नस घालून कोशिंबीर एकत्र अलगद मिसळावी.