कैरीचे सरबत

साहित्य :

  • १ किलो कैरीचा गर
  • दीड कि.साखर
  • १ लि.पाणी
  • अर्धा चमचा सोडियम मेटाबाय सल्फाइड
  • मीठ चवीनुसार
  • अर्धा चमचा वेलची पूड

कृती :

कैरीची साले काढून कैऱ्या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. त्यानंतर त्याचा गर तयार करावा.गर मिक्सरमध्ये फिरवताना त्यात वेलची व हवे असल्यास मीठ, केशर घालावे. त्यानंतर दीड किलो साखरेत १ लि. पाणी घालून गॅसवर ठेवावे व ढवळत राहावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. पाक गार झाल्यावर त्यात कैरीचा गर एकत्र करून त्यात अर्धा चमचा सोडियम मेटाबाय सल्फाइड घालावे. सरबत देताना पाव भाग कैरीचे तयार मिश्रण व पाऊण भाग पाणी व बर्फाचा खडा घालून द्यावे.