काकडी कांदा रायते

साहित्य :

  • २ काकड्या
  • २ कांदे
  • २ हिरव्या मिरच्या
  • २ वाट्या दही
  • १ चमचा मीठ (किंवा जास्त)
  • अर्धा चमचा साखर
  • अर्धा चमचा मिरपूड
  • १ चमचा जिरेपूड
  • पाव चमचा लाल तिखट
  • सजावटीसाठी कोशिंबीर

कृती :

काकडी कांदा रायते

काकडी कांदा रायते

काकड्या व कांदे सोलून बारीक चिरावे. पाणी न घालता दही घुसळावे. मिरच्या उभ्या चिराव्या व मीठ लावून जरा चुरडाव्या.

दह्यात चिरलेले पदार्थ घालावेत. साखर व तिखट घालावे. वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे.

वरून जिरेपूड, मिरपूड व असल्यास कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये ठेवावे. जेवणाचे वेळी थंडगार असावे.