काकडीची कोशिंबीर

साहित्यः

  • २ छोटे काकडी
  • २ कप ताजे दही
  • २ हिरव्या मिरच्या
  • १/४ कप कोथिंबीर बारीक कापलेली
  • १/२ जीरे भाजुन वाटलेले
  • १ बारीक कापलेला कांदा
  • १/२ चमच मीठ
  • १ चमचे साखर

 

कृतीः

काकडी सोलून किसावे, दह्यात जीरे, मीठ व साखर टाकुन मिक्सरमध्ये एकसारखे करून घ्यावे. किसलेला काकडी बारीक कापलेली हिरवी मिरची व कांदा टाकुन मिळवावे आणि सर्विंग डिश मध्ये काढुन वरून कोथंबीर टाकावी थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवुन द्यावे मग पराठ्यांबरोबर खावे.