कणकेच्या वड्या

साहित्य :

  • १ वाटी कणिक
  • अर्धी वाटी रवा
  • ३ चमचे तांदळाचे पीठ
  • १ वाटी पिठीसाखर
  • १ वाटी तूप

कृती :

परातीमध्ये तूप फेसून घ्यावे. त्यात साखर मिसळून पुन्हा हाताने फेसावे. त्यात सर्व पिठे एकत्र करून थोडी थोडी घालत मिसळावी व गोळा करावा. ट्रेला तूपाचा हात फिरवून गोळा त्यावर थापावा व वड्या कापाव्या. नंतर मध्यम ओव्हनमध्ये या वड्या बारा ते पंधरा मिनिटे भाजाव्या. निवाल्यानंतर सुट्या कराव्या.