कारागिरी

विश्रामकालीन हस्तकला व्यावसायिक
कौटुंबिक समारंभम सार्वजनिक मेळे आणि उत्सव अशा विविध ठिकाणी अनेक हस्तकला व्यावसायिकांना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळते. खेड्यांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये ठराविक मनोरंजनाचा अभाव असल्यामुळे चित्रकला, भरतकाम, विण्काम कोरीव काम यासारख्या फावल्या वेळातील उद्योगांना चालना मिळते. शहरात मात्र असा रिकामा वेळ ही एक दुर्मिळ गोष्ट असल्यामुळे हस्तकला व्यवसाय हळूहळू नष्टा होत आहे. बहुधा आपल्या उत्पन्नामध्ये भर घालण्याच्या उद्देशाने जोपासले जाणारे हस्तकलांचे विविध छंद सोडता महानगरामध्ये समर्पित कारागिरी क्वचितच आढळते. ग्रामीण आणि आदिवासी मनुष्य निरित द्रव्याकडे त्यांचा सृजनात्मक उपयोग कसा करता येईल या दृष्टीने पाहातो. आपल्या भोवतीच्या सगळ्या गोष्टींना सजवणे, शोभिवंत करणे याकडे त्याचा स्वभावतःच कल असतो. उदा. महाराष्ट्रातील वारली कुटुंबात बारशाच्या वा विवाहाच्या समारंभाच्या निमित्ताने आपल्या घराच्या भिंतीवर चित्रे काढतात. सामान्यतः स्त्रियाच हे काम करीत असतात, परंतु जिव्या सोमा मसे नावाच्या अत्यंत कुश्ल हस्तकला व्यावसायिकाने या कलेला पूर्णत्व दिले आहे आणि त्याला अनेक उत्सव आणि यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रणे येतात. तेथे त्याच्या सवयीच्या वातावरणापासून दूर असा तो तासन्‌ तास काम करीत बसलेला असतो. त्याने असे यांत्रिकपणे कागदावर चित्रे काढीत बसावे आणि जिज्ञासूना त्याच्या कलेचे प्रदर्शन घडवावे अशी अपेक्षा असते. या परक्या वातावरणात कामकरीत असताना त्याची स्फूर्ती त्याला सोडून गेलेली दिसते आणि परिणामतः त्याच्या कलाकृती निर्जीव आणि निस्तेज वाटतात.जिव्या सोमा मसेला खरी गरज आहे ती त्याच्या स्वतःच्या खेड्यामध्ये स्वतःसाठी ऐक सुसज्ज स्टुडिओ बांधण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीची. तिथे तो त्याच्या आत्म्यातून जिवंत झऱ्यासारखी आलेली आणि आपणा सर्वाना समृद्ध करणारी त्याची कला चिरस्थायी करण्यासाठी व तिचा विकास घडविण्यासाठी अनेक तरुण मुलांना हाताशी धरुन अपल्या कलेचे शिक्षण देवू शकेल.

आदिवासी चित्रकलेप्रमाणेच बंजारा या महाराष्ट्रातील भटक्या जमातीची भरकामकला ही देखील ऐक विश्रामकालीन कला म्हणून विकसित झालेलॊ असून बऱ्यापैकी उत्पन्नाचे साधन बनली आहे. या हस्तकला व्यवसायाचे रहस्य हे आहे की या कारागीरांनी गोपीबाई संग्राम जाधव या निपुणकारागीर बाईंच्या अध्यक्षतेखाली ऐक संघटना स्थापन केली आहे. आपले पारंपारिक रंग आणि रचना टिकवून ठेवण्यासाठी या संस्थेला प्रयत्न करावे लागतात. संस्थेचे सभासदच एकत्रिपणे वस्तूंच्या किमती निश्चित करीत असल्यामुळे किमती खाली आणण्यासाठी त्यांच्यात परपस्परांच्या विरूध ग्राहकांनेई स्पर्धा निर्माण करण्यात धोका कमी होतो. महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ते आपल्या वस्तूंच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड करीत नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या कलेचे मूल्य जाणकारांत नेहमीच अधिक मानले जाईल.