कारागिरी

हंगामी कारागीर
शेती करणारी किंवा कृषिव्यसायशी संबंधित असणारी अनेक कुटुंबे किंवा ग्रामीण भागात राहणार्या लोकांना वर्षातून त्यांच्या नेहमीच्या क्मातून फुरसतीचा वेळ मिळतो. त्यावेळी ते एखादा हस्तकला व्यवसाय करू शकतात. पावसाची वाट पाहाण्याच्या किंव पीक तयार होण्याच्या काळात ते आपल्या जमिनीतून मिळणाऱ्या गोष्टींपासून काहेई वस्तू तयार करण्याकडे वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागीरांमध्ये सर्वात उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि चट्या विणणारे लोक. एके काळी महाराष्ट्रात ते घोळक्याघ्ळक्याने एका आंबराईतून दुसऱ्या आंबराईत हंगांमाच्या इद्वसात हिंडत असत. बाजारात फळे पाठवण्यासाठी लागणाऱ्या टोपल्या विणण्यासाठी त्यांना पैसे दिले जात दुर्दैवाने आज त्यांचे आंबईत जाणे थांबले आहे आणि त्यामुळे आंबे पाठविण्यासाठी टोपल्यांऐवजी किमती लाकडाची खोकी वापरली जातात. इतर बऱ्याच राज्यांमध्ये वेत आणि बांबू यांचे पुरेसे उत्पादा होत असल्यामुळे अनेक लोकांना वर्षभर पुरेल ऐवढे विणण्याचे काम मिळू शकते. महाराष्ट्राच्या बहुतेक भागामध्ये टोपल्या विणणाऱ्याला सुकलेली पाने, तंतू, साली आणि थोडासा बांबू (उत्तम प्रकारचा बहुतेक बांबू कागद कारखान्यांनी हस्तगत केलेला) यांवर विसंबून राहावे लागते. अखेरीस, अवर्षण काळात कामही नाही आणि पाणीही नाही अशा स्थितीत खेडूत स्थलांतर करतात. त्यातले कित्येक खेड्यांकडे पुन्हा फिरकतही नाहीत.

या हंगांमी वस्तू विकण्याचे आणि तयार करण्याचे किंवा कारागीराच्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी विनिमयाखातर वापरता येण्याचे ठिकाण म्हणजे जत्रा किंवा मेळे. स्वस्तातले कृत्रिम धाग्याचे कापड आणि अशाच काही वस्तू विकणारे शहरी दुकानदारही या ठिकाणी येतात आणि कारागीरांना स्थानभ्रष्ट करतात. मेळा किंवा यत्रा हे युवक-येवुतींना एकत्र आणणरे, रात्र नाचगाण्यात घालवण्याचे आणि आपापले जीवनसाथी शोधण्याचे ठिकाण. पण ते देखील आता हौशी पर्यटकांनी घेरून टाकल्यामुळे, एरवी खेडुतांना भावपूर्ण वाटणरी ही घटना आता “टूरिझम” च्या नावाखाली बीभत्स बनली आहे.

लोकांना एकमेकांशी भेटण्याची, विचारविमर्श करण्याची, तसेच प्रसिद्ध कलावंतांना पाहण्याची मेळ्यात संधी मिळते. परंतु तेही आता राजकीय पक्षांच्या केंद्रातून ध्वनिक्षेपकातून वाहाणार्‍या कर्कश, कानठळ्या बसवणार्‍या आवाजाने किंवा अधूनमधून वाजवल्य जाणऱ्या फिल्मी गीतांनी वा राजकीय घोषणांनी मूक झाले आहेत. आपल्या खेडुतांची मुळातली सहज आणि प्रेमळ संस्कृती बाजूला फेकली जाते आहे आणि कारागीराने केलेल्या वस्तूंच्या विक्रीची एकमेव संधी खरोखर नष्ट होत आहे.