कारागिरी

पारंपारिक अथवा आनुवंशिक हस्तकला व्यावसायिक
केवळ जन्मामुळे भारतातील मुले अगणित पिढ्यांनी सोपवलेल्या समृद्ध परंपरेची वारस ठरतात. छोट्या खेड्यात किंवा वाडवडिलांनी बांधलेल्या देवळांच्या, राजवाड्यांच्या , स्मारकांच्या परिसरात राहणारी ही मुले जीवनाच्या आनि शिक्षणाच्या कडक नियमांचे पालन करीत वाढतात व हस्तकला व्यावसायिकांची एक नवी पिढी उदयास येते. हे परंपरा दीक्षित हस्तकला व्यावसायिक देशातल्या सर्वोत्तम वस्तू निर्माण करतात.

औद्योगिक संस्था हस्तकला व्यावसायिक प्राधान्याने निवडतात ते त्यांच्या शिस्त. एकाग्रता आणि हातांच वापर करण्याची क्षमता या गुणांमुळे. जादा मजुरी, शहरी संस्कृतीचे आकर्षण यांमुळे हळूहळू हस्तकलाव्यासियक ग्रामीण प्रदेश सोडूननिघून जात आहेत. शहरातील झोपडपट्टीत रह्त असलेले हे माजी हस्तकला व्यावसायिक आपल्या मुलांना कलेचा वारासा देऊ शकत नसल्यामुळे ही मुले यापुढे अकुशल कामगार म्हणून वाढतील. पारंपरिक शिक्षणाचे मूल्यमापन करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोतआणि ते आपल्या शिक्षण पद्धतीतून वगळून तरूण पिढीवर अन्याय करीत आहोत ही एक शोकात्मिका आहे.