कारागिरी

विणकाम
या शतकाच्या आरंभापर्यन्त वस्त्र ही या राज्यातील एक उल्लेखनीय निर्मिती होती. पुढे या उद्योगावर नियंत्रणे आली. परंतु १९४७ मध्ये मिळालेल्य राजकीय स्वातंत्र्यामुळे आपल्या क्षीण झालेल्या हस्तकला परंपरेविषयीच्या कुतूहलाचे पुनरुज्जीवन झाले. महाराष्ट्रात विणलेल्या सतरंज्या बिचायतीसाठी प्रसिद्ध आहेत आणि महाराष्ट्रीय साड्या व खण यांना स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्व आहे.