कारागिरी

कुंभकला
वाढत्या शहरीकरणामुळे हस्तकला व्यावसायिकांना टिकून राहता यावे म्हणून शहरी मागण्यांशी जुळवून घेणे व तसा पुरवठा करणे भाग पडले आहे. आपल्या राज्यात, खेड्यात आणि शहरातल्या कुंभारवाड्यात, अतिशय सामान्य प्रतीची मातीची भांडी तयार करणारे थोडे कुंभार आहेत. ‘नव्या’ कुंभाराचे काम अधिक उत्साहवर्धक आहे. त्यातले बहुतेक स्वतःला कलावंत समजतात. शासनाने या हस्तकलेचे संरक्षण आणि विकास व्हावा यासाठी भद्रावती येथे एक योजनाबद्ध उपक्रम सुरू केला आहे आणि हे इतर केंद्रासाठी एक उदाहरण ठरू शकेल अशी आशा आहे.