कारागिरी

धातुकाम
सोने आणि चांदी यांचे अलंकार बनवण्याचे काम वाढलेले आहे. परंतु अलीकडच्या सर्जनशील दिसत नाही. चांदीचे अलंकार भागशः तयार केले जातात. एकच कारागीर एखादा अलंकार सुरूवातीपासून शेवटपर्यन्त घडवत नाही. मुख्य कारागीर- तो त्या केंद्राचा मालकही असतो- कनिष्ठ कारागीरांना भाग घडवण्यासाठी कामावर ठेवतो. ते भाग नंतर जुळवले जातात. त्यामुळे शिकाऊ उमेदवार ही कारागिरी संपूर्णतेने शिकू शकत नाही आणि स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. कोल्हापूर आणि हूपरी येथील केंद्रामध्ये जुने आणि उत्तम घडणीचे घाट तयार होतात. परंतु कुशलता हळूहळू कमी होते आहे आणि धंदेवाइकांच्या हातांमध्ये ही घडवणूक जाते आहे.

तांबे, जस्त कथिल, पितळ, कासे, तसेच इतर मिश्र धातूंपासून बनवलेल्या भांड्यामध्ये उत्तम कसब प्रत्ययाला येते. धातूच्या जबर किमतीचा खपावर, परिणाम झालेला असल्यामुळे नाशिकसारख्या धातुकामाच्या संदर्भात महत्त्वाच्या केंद्रात पुष्कळ कारागीरांना रिकामे बसून राहावे लागते. बेकारे असूनही बरेच मूर्ती आणि भांडी बनवणारे कारागीर पांढऱ्या धातूच्या ‘कलात्मक कामच्या’ व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या मागण्या स्वीकारणार नाहीत. पिढ्यान पिढ्या कारागीर ‘उपयोग’च्या वस्तू बनवीत आले आहेत. कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता एक साधे भांडे किंवा चमचा घडवण्यात ते तासन तास वेळ घालवू शकतात; परंतु ‘निरूपयोगी’ शोभेच्या वस्तू बनवण्याची कल्पना त्यांना देवाने निर्माण केलेल्या साधनांचा दुरूपयोग आहे असे वाटते.