कासव आणि बेडूक

एका नदीकाठावरील गवतात काही बेडूक खेळून आणि उडया मारून स्वतःची करमणूक करीत होते. तो प्रकार कासवांनी पाहिला, तेव्हा आपणास अशा उडया मारता येत नाहीत म्हणून त्यांत फार वाईट वाटले. इतक्यात त्या बेडकांस नाचताना पाहून एक घार आकाशातून खाली उतरली आणि तिने त्या सर्वांस खाऊन टाकले. ते पाहून एक कासव इतर कासवांस म्हणतो, ‘अंगांत उडया मारण्याची शक्ति असून मरण येण्यापेक्षा, ती शक्ति नसलेली पुरवली.’

तात्पर्य:- देवाने ज्याला जन्मतःच जे गुण दिले आहेत, तेच त्याला हितकर होत.