केळ्याची धिरडी

साहित्य :

  • ४ पिकलेली केळी
  • १ वाटी गूळ
  • २ वाट्या कणिक
  • अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  • अर्धी वाटी ओले खोबरे
  • तळण्यास तेल किंवा तूप
  • अर्धा चमचा मीठ

कृती :

केळ्याची धिरडी

केळ्याची धिरडी

गूळ बारीक चिरावा. केळी कुस्करावी.

त्यात गूळ, खोबरे व दोन्ही पिठे घालावी.

जरूरीपुरते पाणी घालून धिरड्याचे पीठ तयार करावे. नेहमीप्रमाणे धिरडी घालावी.