केशवा माधवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा ॥धृ॥

तुझ्या सारखा तूच देवा
तुला कुणाचा नाही हेवा

वेळोवेळी संकटातुनी
ताराशी माधवा ……….॥१॥

वेडा होऊनी भक्तीसाठी
गोप गड्यासह यमुना काठी

नंदाघरच्या गाई हाकशी
गोकुळि यादवा……..॥२॥

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊन हाती

रथ हाकुनिया पांडवाचा
पळविशी कौरवा ….॥३॥

1 thought on “केशवा माधवा

Comments are closed.