खजुराच्या करंज्या

साहित्य
२०० ग्रॅम बिनबियाचा खजूर.
सारण:

 • अर्धी वाटी पिठीसाखर
 • १ टेबल चमचा खसखस
 • २ टेबल चमचा सुक्या खोबऱ्याचा कीस.
 • वरील आवरण :

 • दीड वाटी मैदा
 • पाव चमचा मीठ
 • १ टेबल चमचा तुपाचे मोहन
 • थोडेसे दूध.
 • कृती :

  तूप फेसून घ्यावे. नंतर मैदा, तूप व मीथ एकत्र करून दुधाने पीठ भिजवावे. खजूर वाटावा. खसखस, खोबरे भाजावे, खसखस वाटावी. खोबरे चुरून घ्यावे. नंतर खजूर, कसखस, खोबरे व पिठीसाखर एकत्र करून सारण तयार करावे.मैद्याच्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून करंज्या तयार करा. ह्या करंज्या तव्यावर दोन्हीकडून जरा शेकून घ्या व नंतर तळा.