खंडोबा आणि साप

लोक आपणास विनाकारण मारतात आणि छळतात, अशी एका सापाने खंडोबाजवळ फिर्याद केली. ती ऐकून खंडोबा त्यास म्हणाला, ‘अरे, हा तुझाच दोष आहे. ज्या मनुष्याने तुला पहिल्याने त्रास दिला, त्याला जर तू सपाटून चावला असतास तर इतर लोक तुझ्या वाटेस कधीही गेले नसते.’

तात्पर्य:- आपणास त्रास देणाऱ्या एक माणसास क्षमा केली की दुसरी माणसेही आपणास त्रास देऊ लागतात; यासाठी मनुष्याने पहिल्यापासूनच सावध असावे.