खंडोबा आणि माकड

एकदा खंडोबाच्या मनात आले की सगळे पक्षी व पशु व यापैकी कोणाची पिल्ले सर्वात सुंदर दिसतात, हे पहावे. मग त्याने सर्व पक्ष्यांस आपापली पिल्ली घेऊन आपल्या दरबारात हजर राहण्याचा हुकूम केला. त्याचप्रमाणे सगळे पशुपक्षी आपापल्या पिल्लांसह खंडोबापाशी जमले असता, माकड आपल्या पोरांसह सर्वांच्या पुढे येऊन खंडोबास म्हणाले, ‘देवा ! इतकी सुंदर मुले सगळ्या जगात सापडावयाची नाहीत !’

तात्पर्य:- आपापली मुले सर्वांस चांगली दिसतात.