खारी बालुशाही

साहित्य :

  • ४ वाट्या मैदा
  • अर्धी वाटी दही
  • २ चमचा डालडाचे मोहन
  • मीठ-मिरपूड.

कृती :

सर्व एकत्र करून पीठ भिजवा. जरुरीप्रमाणे थोडे पाणी वापरा.नंतर थोड्या वेळाने मळून घ्या. त्याचे पेढ्याएवढे गोळे करा व हाताने जरा चपटे करा. तळताना कचोरीप्रमाणे तळा. तसे चांगले गरम झाले की खाली उतरवा. त्यात मैद्याचे गोळे टाका. बुडबुडे येण्याचे थांबले की कढई पुनः गॅसवर ठेवा व नंतर बदामि रंगावर आले की काढा.