खव्याचे गुलाबजाम

साहित्य :

  • ५०० ग्रॅम खवा
  • १ वाटी बारीक रवा
  • ७५० ग्रॅम साखर
  • थोडा रोझ इसेन्स
  • चिमूटभर खायचा सोडा

कृती :

खव्याचे गुलाबजाम

खव्याचे गुलाबजाम

खवा पुरणयंत्रातून काढा. नंतर त्यात रवा व सोडा घालून मळा.
वरील मिश्रणाचे ५० ग्रॅम करा.
साखरेत पाणी घालून कच्चा पाक करून त्यात रोझ इसेन्स घाला.
वरील गोळे तुपात तळा व पाकात टाका. गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा.
अर्धा तास मुरल्यानंतर वाढा.