खोट्या दातांची कवळी

वर्गात शिकवता शिकवता गुरुजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. “बरं का बाळांनो? खोटं ते खोटं. ते कधीहि उपयोगी पडणं शक्य नाही, म्हणून जे खोटं आहे, त्याला आपण कधीही थारा देता कामा नये. ”

याप्रमाणे बोलून त्यांनी बापूला विचारलं, “काय रे बाप्या ? माझ म्हणणं तुला पटलं ना ? ”

यावर बापू म्हणाला, ” गुरुजी, प्रत्यक्ष खोट्या दातांची कवळी तुमच्या तोडांत दिसत असताना, तुमचं म्हणणं मला कसं पटेल?”