किडा आणि खोंकड

एका किडयाने उकिरडयातून आपले तोंड बाहेर काढले आणि मोठयाने ओरडून सर्वांस म्हटले, ‘अहो, जर कोणाची प्रकृती बिघडली असेल, तर त्याने मजकडे यावे. मजपाशी अशी रामबाण ओषढें आहेत की, त्यांजपुढे कोणताही रोग पळून गेलाच पाहिजे.’ यावर एक खोंकड त्या किडयास म्हणाला, ‘अरे, ज्या तुला तुझ्या स्वतःच्या अंगांतला घाणेरडेपणा काढून टाकतां येत नाही, तो तूं दुसऱ्याची रोग कसे बरे करणार ?’

तात्पर्य:- ज्यास स्वतःच्या अंगांतले दोष काढून टाकतां येत नाहीत, त्याने दुसऱ्यास शिक्षण देण्याचा आव आणणे हा केवळ मूर्खपणा होय.