कोहळ्याचे सांडगे

साहित्य:

  • उडीद डाळ
  • कोहळा
  • तिखट
  • मीठ
  • मेथीची पावडर
  • हिंग

कृती :

अर्धा किलो उडीद डाळ सकाळी भिजवावी व रात्री मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आंबिवलेल्या पिठात पाऊण किलो वजनाच्या कोहळ्याचा कीस घालावा. त्यात सहा चमचे (मोठे) तिखट, मीठ, एक चमचा मेथीची पावडर, दोन चमचे हिंग घालून सर्व मिश्रण ढवळून घ्यावे.

प्लास्टिकच्या मोठय़ा पेपरवर चमच्याने सांडगे घालावेत. साधारणत: संध्याकाळपर्यंत ते वाळतात व प्लास्टिकपासून वेगळे होतात. नंतर ते परातीत घालून आठ ते १० दिवस कडकडीत उन्हात वाळवावेत व हवाबंद डब्यात बंद करून ठेवावेत.हे सांडगे खोबऱ्याच्या रसाच्या आमटीत चांगले लागतात. तोंडलावणीसाठी नुसतेच तळूनही खातात किंवा तळलेल्या सांडग्याचा थोडा चुरा करून त्यात कांदा खोबरे घालून कोशिंबीर करतात.