कोकम जीरा गोळी

साहित्य:

  • पाव किलो कोकम
  • दोन चहाचे चमचे जिरे व पिठीसाखर
  • मीठ चवीनुसार

कृती:

अर्धा कप कोमट पाण्यात कोकम भिजत घालावे. अर्ध्या तासाने त्यातले पाणी (सरबतासाठी) काढून घ्यावे. भिजलेली कोकमं, जीरे, मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. मिश्रणाच्या वाटाण्याएवढया गोळ्या करून त्याला दोन उन्हे दाखवावीत. त्या ओलसर असताना पिठीसाखर लावून पुन्हा वाळवून घ्याव्या.