कोल्हा आणि द्राक्षे

एक भुकेलेला कोल्हा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मांडवाखाली आला. वर पाहतो तो सुंदर पिकलेले द्राक्षाचे घड लोंबत आहेत; परंतु मांडव उंच असल्यामुळे ते त्याच्या हाती लागेनात. त्याने पुष्कळ उडया मारल्या, परंतु एकही द्राक्ष त्यास मिळाले नाही. मग अंमळ दूर जाऊन द्रक्षांकडे पाहून तो म्हणतो, ‘ही द्राक्षे जो कोणी घेईल ते घेवो, मी तर ही हिरवी व आंबट म्हणून सोडून देतो.

तात्पर्य:- कित्येक लोक असे असतात की, त्याच्या हाती एखादी चांगली वस्तू लागली नाही म्हणजे तिला ते काही तरी खोड ठेवून आपला हलकेपणा लपविण्याचा प्रयत्न करतात.