कोल्हा आणि खेकडा

एक खेकडा समुद्रातून किनाऱ्यावर आला असता त्यास एका कोल्हयाने पकडले. मग तो त्यास आता मारून खाणार, तो खेकडा आपल्याशीच म्हणतो, ‘हा माझ्याच मूर्खपणाचा परिणाम. मी समुद्रात असावे, ते सोडून जमिनीवर येण्याची उठाठेव मला कोणी सांगितली होती ?’

तात्पर्य:- ज्या गोष्टींशी आपला काही संबंध नाही, त्या गोष्टींची उठाठेव करणारा संकटात सापडला, तर त्यात काही आश्चर्य नाही.