कोल्हा आणि मुखवटा

एके रात्री, एक कोल्हा एका मुखवटे विकणाराच्या दुकानात शिरला. तेथे पुष्कळ मुखवटे होते, त्यातील एकावर एक पाय ठेवून, त्याजकडे नीट न्याहाळून तो म्हणतो, ‘हे मस्तक फार सुंदर दिसते खरे, पण यात रक्त नाही, मांस नाही व मेंदूही नाही. हे केवळ थट्टेच्या मात्र उपयोगी.

तात्पर्य:- ज्यास ज्ञान नाही, त्याचे सौंदर्य थट्टेस पात्र होते.