कोंबडा आणि रत्न

एक तरूण कोंबडा, दोन तीन तरण्या कोंबडया बरोबर घेऊन उकिरदा उकरीत होता. त्यात त्यास एक रत्न सांपडले. ते रत्न फार चकाकत होते. यावरुन हे रत्न आहे, असे त्याने ताडले, पण त्याचा उपयोग कसा करावा हे त्यास ठाऊक नव्हते. मग त्याने आपला मूर्खपणा झाकावा म्हणून त्या रत्नाची थट्टा चालविली. पंख उघडून, मान हालवून आणि तोंड वांकडे करून तो त्या रत्नास म्हणाला, ‘अरे ! तू फार सुंदर आहेस खरे, पण मला तुझा काय उपयोग ? मला तर सृष्टींतल्या सगळ्या रत्नाची किंमत जोंधळ्याच्या एका दाण्याइतकी वाटत नाहीं !’

तात्पर्य:- कोणतोही वस्तु आपल्या उपयोगाची नसली म्हणून तिची म्हणून तिची थट्टा करणे हा मूर्खपणा होय.