कुरकुरीत पुर्‍या

साहित्य :

  • ३ वाट्या मैदा
  • १ चमचा कलौजी
  • १ चमचा बडिशेप
  • अर्धा चमचा मेथी
  • १ चमचा साखर
  • १ चमचा मीठ
  • ३ चमचा कडकडीत तुप
  • तुपाचे मोहन.

कृती :

कलौजी, बडिशेप व मेथी ह्यांची पूड करा. नंतर सर्व एकत्र करून गरम पाण्यात पीठ भिजवा.
थोड्या वेळाने मळून पोळ्यापाटावर मोठी जाडसर पोळी लाटा. नैवेद्याच्या वाटीने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पाडा. पुरीला जेवायच्या काट्याने भोके पाडा व मंदाग्निवर तळा.