कुटुंब नियोजन पद्धती : फायदे : तोटे

१. कुटुंब नियोजनाचा प्रकार : स्त्री शस्त्रक्रिया

फायदे :
१. बाळंतपणानंतर, पाळीनंतर, सिझेरियन किंवा अ‍ॅबार्शनबरोबर, पोटाकडून दुर्बीणीतून किंवा योनी मार्गातून करता येते.
२. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केल्यास दोन दिवसच हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
३. शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन, पाठीत इंजेक्शन देऊन किंवा जागीच इंजेक्शन देऊन करता येते.
तोटे :
१. शस्त्रक्रियेनंतर परत मूल पाहिजे असल्यास जोड शस्त्रक्रिया केली तरी त्यानंतर पुन्हा गर्भधारणा होण्याचा प्रमाण फारच कमी आहे.

२. कुटुंब नियोजनाचा प्रकार : पुरुष शस्त्रक्रिया

फायदे :
१. पुरुष शस्त्रक्रिया स्त्रियांच्या शस्त्रक्रियेपेक्षा सोपी आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहावे लागत नाही.
२. सामान्यपणे या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण भूल द्यावी लागत नाही.
३. या शस्त्रक्रियेनंतर पुरुषत्व नाहीसे होत नाही. तसे कोणतेही काम केल्यास त्रास होत नाही.
तोटे :
१. या शस्त्रक्रियेनंतर एक महिना इतर कुटुंबनियोजनाची साधने वापरावी लागतात. एक महिन्यानंतर वीर्य तपासणी करून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री करून घ्यावी लागते.

३. कुटुंब नियोजनाचा प्रकार : स्त्रीने घ्यावयाच्या गोळ्या
फायदे :
१. हे तात्पुरते कुटुंबनियोजनाचे साधन आहे.
२. या पद्धतीमुळे गर्भधारणाचे प्रमाण अतिशय अल्प आहे.
तोटे :
१. खर्चिक पद्धत आहे.
२. गोळ्या सुरू करण्याच्या आधी व वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी लागते.
३. या गोळ्यांमुळे काही स्त्रियांना मळमळणे, उलट्या होणे, वजन वाढणे इ. त्रास होण्याची शक्यता असते.

४. कुटुंब नियोजनाचा प्रकार : गर्भाशय वलय पद्धती  (I.V.C.D. )
फायदे :
१. या पद्धतीतील साधने कमी खर्चाची, वापरण्यास सोपी व जास्त यश देणारी आहेत.
२. ही तात्पुरत्या स्वरूपातली साधने आहेत. म्हणून ती काढून टाकल्यावर परत मुले होऊ शकतात
तोटे :
१. हे साधन गर्भाशयात बसवण्याआधी व नंतर वेळोवेळी डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी लागते.
२. यामुळे अंगावरून पाळीच्या वेळी जास्त जाणे पांढरे जाणे, पोटात दुखणे असे विकार होऊ शकतात.

५. कुटुंब नियोजनाचा प्रकार : रासायनिक साधने ( जेली, फोस गोळ्या, क्रीम )
फायदे :
१. ही साधने इतर साधनांबरोबर वापरल्याने  यशाचे प्रमाण वाढते.
तोटे :
१. या साधनामुळे स्त्रीस त्रास होण्याचा संभव असतो. उदा. आग होणे, खाज सुटणे, इत्यादी
२. ही साधने वापरण्यासाठी समागमाआधी वेळ व जागा लागते.

६. कुटुंब नियोजनांचा प्रकार : कडोम (निरोध)
फायदे :
१. याच्या वापरामुळे गुप्तरोग पसरणेची शक्यता गुप्त रोग असलेल्या पुरुषाकडून कमी असते.
२. निरोध निरनिराळ्या रंगात व औषधी द्रव्ये लावून बुळबुळीत केलेले मिळते.
तोटे :
१. याच्या वापरामुळे समागमाचा आनंद कमी मिळण्याची शक्यता असते.
२. वापरण्यापूर्वी या साधनांची चाचणी करून घ्यावी लागते.

७. कुटुंब नियोजनाचा प्रकार : डायफ्राम
फायदे :
१. याचा उपयोग जेली बरोबर करावा लागतो.
तोटे :
१. डायफ्राम बसवण्याचे शिक्षण घ्यावे लागते.
२. बाळंतपणनंतर योनीचा आकार बदलतो व त्यामुळे डायफ्रामसाठी नवीन मापे घ्यावी लागतात.
३. समागमाआधी डायफ्राम बसवणेसाठी जागा व वेळ लागते.

८. कुटुंब नियोजनाचा प्रकार : अपूर्ण समागम पद्धती
फायदे :
१. प्रसंगी कोणतेच साधन नसल्यास या पद्धतीचा वापर करता येतो.
तोटे :
१. यामुळे पती पत्नीला मानसिक ताण पडतो.
२. पती-पत्नीस समागमाचा आनंद खऱ्या अर्थानं मिळत नाही.

९. कुटुंब नियोजनाचा प्रकार : सुरक्षित काळ पद्धती
फायदे :
१. कोणतेही साधन न वापरता व काही खर्च न करता वापरता येते.
तोटे :
१. प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीप्रमाणे ( पाळीप्रमाणे ) हा सुरक्षित काळ बदलत असतो.
२. समागम हा आंतरिक इच्छेने न होता दिवसांच्या हिशेबाने करावा लागतो.

कुटुंब नियोजन पद्धती व गर्भधारणेचे प्रमाण
१. पद्धत    :
तोडांने घ्यावयाच्या गोळ्या     :
गर्भधारणेचे प्रमाण / १०० स्त्रियात १ वर्षांपर्यंत
०.१ ते २

२. पद्धत :
निरोध
गर्भधारणेचे प्रमाण / १०० स्त्रियात १ वर्षांपर्यंत :
७.५ ते ११.१

३. पद्धत    :
डायफ्राम व जेली
गर्भधारणेचे प्रमाण / १०० स्त्रियात १ वर्षांपर्यंत :
७.२ ते १७.५

४. पद्धत    :
अपूर्ण समागम पद्धती
गर्भधारणेचे प्रमाण / १०० स्त्रियात १ वर्षांपर्यंत :
१२ ते २०

५. पद्धत :
सुरक्षित काळ पद्धती
गर्भधारणेचे प्रमाण / १०० स्त्रियात १ वर्षांपर्यंत :
१४.४ ते २५

६. पद्धत :
फोमच्या गोळ्य
गर्भधारणेचे प्रमाण / १०० स्त्रियात १ वर्षांपर्यंत :
११.९ ते ४२.८

७. पद्धत :
स्त्री शस्त्रक्रिया ( मॅडलेनर पद्धती )
गर्भधारणेचे प्रमाण / १०० स्त्रियात १ वर्षांपर्यंत :
०.१ ते ०.२