साहित्य :
- अर्धा किलो लाल भोपळा
- दाणेकूट अर्धी वाटी
- कोथिंबीर चिरून थोडीशी
- जिरे दोन चिमटी
- मीठ
- तूप फोडणीसाठी
- दोन मिरच्या
कृती :
भोपळ्याच्या साली काढून आतील बिया काढून टाका. मधल्या गराच्या पातळ, लांबट फोडी करा. धुऊन भांड्यात ठेवा. तुपात जिऱ्याची फोडणी करा. तडतडू लागल्यावर त्यात भोपळा फोडी घाला. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घाला. मिरची ठेचा यात घाला. मीठ, दाणेकूट घाला. ढवळा. झाकण ठेवून मंदाग्नीवर शिजवा. शिजल्यावर वरून चिरलेली कोथिंबीर घाला.