लाल भोपळ्याचे कबाब

साहित्य :

 • ५०० ग्रॅम लाल भोपळा
 • २ लिंबू
 • १ वाटी डाळीचे पीठ
 • १ चमचा गरम मसाला
 • १ कांदा किसून
 • १ चमचा धणे जिरेपूड
 • १ लहान आल्याचा तुकडा वाटून
 • थोडेसे लाल तिखट
 • मीठ
 • २ अंड्यातले पांढरे
 • थोडा पुदिना
 • २ टेबलस्पून दही

कृती :

लाल भोपळ्याचे कबाब

लाल भोपळ्याचे कबाब

भोपळ्याची साले काढून अगदी बारीक चिरुन घ्यावा. नंतर ह्या चिरलेल्या फोडी लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात थोडा वेळ ठेवाव्यात.

नंतर त्याच पाण्यात भोपळा शिजवून घ्यावा.

फोडी शिजल्या पाहिजेत, पण पाणी अजिबात राहता कामा नये.

गार झाल्यावर सर्व मिश्रण पुरणयंत्रातून काढावे.

नंतर त्याचे पेढ्याएवढे गोळे करुन हाताने जरा चपटे करावेत व तळावेत.

टोमॅटो सॉससोबत खाण्यास द्यावे.