लाऊ का लाथ

Lau ka Laath movie preview

  • निर्माताः विजय पाटकर
  • दिग्दर्शकः विजय पाटकर
  • संगीतः अविनाश-विश्वजीत
  • कलाकारः विजय पाटकर, हेमलता बाणे, विजय कदम, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, कमलाकर सातपुते.
  • प्रदर्शन दिनांकः १ जून २०१२.

या चित्रपटात विजय पाटकरने नामदेवची मुख्य भूमिका केली आहे. गावात नामदेव शिंपीचे काम करत असतो व लोकं त्याला नाम्या ह्या नावाने संबोधत असतात. नामदेवकडे दीडशे वर्षे जुनी चप्पल असते. ही चप्पल आपल्यापासून कितीही दूर गेली तरी ती परत फिरुन आपल्याकडेच येते असा त्याचा ठाम विश्वास असतो. एका तमाशा कलावंतिणीत त्याचं हृदय अडकतं. दरम्यान, गावात दरोडेखोर येतो. तो नेमकी कोणती गोष्ट चोरतो आणि नंतर त्या चपलेचं काय होतं, अशी ही चित्रपटाची कथा आहे.