लिची सरबत

साहित्य :

  • १ लि.लिची रस
  • १ लि.पाणी
  • २ कि.साखर
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • अर्धा चमचा KMS

कृती :

प्रथम लिचीची साले व बिया काढाव्यात. थोडेसे पाणी घालून मिक्सरवर फिरवावे. १ लि. रस व्हावा इतक्या लिची घ्याव्यात. मग साखर, पाणी, सायट्रिक अ‍ॅसिड एकत्र करून गॅसवर उकळी आणण्यास ठेवावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा. सिरप थंड झाल्यावर त्यात लिचीचा रस व KMS मिक्स करावे. सिरप
गाळून घ्यावे. सरबत देताना ग्लासमध्ये पाव भाग सिरप व पाऊण भाग पाणी एकत्र करावे. सरबत तयार होईल.