Category Archives: चातुर्य कथा

चातुर्य कथा | Chaturya Katha

ओवाळणी

या पानाचा नवीन दुवा येथे उपलब्ध आहे:  http://www.marathimati.com/balmitra/stories/chaturya-katha/ovalani/

पुढ्यात पैसे नाही ठेवले.

या पानाचा नवीन दुवा येथे उपलब्ध आहे:  http://www.marathimati.com/balmitra/stories/chaturya-katha/pudhyat-paise-nahi-thevale/

मेले कोण ! नेले कुणाला ?

या पानाचा नवीन दुवा येथे उपलब्ध आहे: http://www.marathimati.com/balmitra/stories/chaturya-katha/mele-kon-nele-kunala/

वहाणेचा लिलाव !

पंडित मनमोहन मालविय हे विद्बान व सच्छील नेते बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या उभारणीसाठी घरोघरी व गावोगावी फ़िरुन निधी गोळा करीत होते. असेच फ़िरता फ़िरता ते एका संस्थानाच्या नवाबाकडे गेले व आपण हाती घेतलेल्या कार्याची त्यांना माहीती देऊन त्यांनी त्यांच्याकडे देणगी मागितली.’
नवाब देणगी द्यायला तयार होईना म्हणून मालवियांनी त्यांच्याकडे आपलं उपरणं पसरलं व ते त्याला म्हणाले, ‘हुजूर, आपल्यासारख्यांकडे आलोय, तेव्हा रिकामे परत पाठवू नका. आपल्या इच्छेला येईल ते या उपरण्याच्या झोळीत टाका.’

उर्मट नवाबाने एका पायातली वहान काढली व ती पंडितजींच्या उपरण्यात टाकली. परंतू एवढा अपमान होऊनही न रागवता, पंडित मालवीय त्या वहाणेसकटं तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशीच्या दोन तिन प्रमुख वर्तमानपत्रात पुढील आशयाचे निवेदन अगदी ठळक अक्षरांमध्ये झळकले !

‘बनारस हिंदू विश्व विद्यालयाच्या उभारणीसाठी देणगी मागायला गेलो असता, एका श्रीमंत नवाबाने माझ्या झोळीत वहाण टाकली. या वाहणेचा जाहीर लिलाव दि. … रोजी …. या ठिकाणी होईल, या लिलावात वहाणेला येणारी किंमत बनारस हिंदू विश्व विद्यालयाला देणगी म्हणून देण्यात येईल व त्या वेळी ‘उदार’ नवाबाचे नाव उघड केले जाईल. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या लिलावास उपस्थित रहावे. – पंडित मोहनदास मालवीय

वृत्तपत्रात हे निवेदन झळकताच नवाबाच्या तोंडाचे पाणी पळाले. जाहिरात झळकली त्याच दिवशी संध्याकाळी अंधार पडल्यावर, त्या माथेफ़िरु नवाबाचा दिवाण जातीने पं. मालवीयांकडे गेले व हात जोडून त्यांना म्हणाला, ‘पंडितजी, आपल्याला जेवढी हवी असेल, तेवढ्या रकमेची देणगी नवाब साहेब द्यायला तयार आहेत, पण तो लिलाव तेवढा रद्द करा. आणि खांविदांची वहाण परत करा.’

पंडितजींनी मागितलेली देणगी त्या दिवाणाने आणून देताच, त्यांनी ती वहाण त्या दिवाणाला परत केली व दिवाण रद्द झाल्याचे दुसरे निवेदन वृत्तपत्रात दिले.

मोरोपंताची समयसूचकता

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिध्द असलेली मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठं छान सांगत.

एकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असता, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचं तरी काय ?’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभाऱ्यांच्या कानत त्यासंबंधी कुजबुजु लागले.

ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्यामनात तत्क्षाणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले, ‘
आर्या –
भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे /
ऎसे असता माझ्या बिदागीचा का तुम्हास घोर पडे //
ही आर्या कानी पडताच श्रोतृवृंदात हास्याची खसखस पिकली. घोरपड्यांनी मोरोपंताच्या या समयसुचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन, त्याच क्षणी आपल्या गळ्यातला कंठा काढून तो त्यांच्या गळ्यात घातला.

मिठाची मिठ्ठास कामगिरी

इटलीतील एक ख्यातनाम परंतू गरिब चित्रकार बफ़ालमॆके याने एका लंब बैठ्या खोलीत राहण्यासाठी जागा घेतली.योगायोग असा की नेमका त्याच्या लगतच्या खोलीत हातमागावर लोकरीचं कापड विणणारा विणकर राहत होता. हा विणकर तासा चांगला सुखवस्तु असला तरी, अतिशय लोभी व निर्दयी होता. तो आपल्या बायकोला मध्यरात्रीपर्यंत हातमागावर कापड विणायला लावी व स्वत: मात्र गाढोगाढ झोपा जाई. रात्रीच्या निवांत वेळी चालविल्या जाणार्‍या हातमागाच्या खडखडात त्या चित्रकारालाही निवांट झोप घेणे अशक्य होऊ लागले. अखेर विचार करुन त्याने एक युक्ती शोधून काढाली.

त्याच्या या विणकराच्या खोल्यांच्या मधल्या खोलीच्या सामाईक भिंतीवर चुलीच्या वर मधोमध भोक पडलं होतं. विणकराच्या बायकोने स्वंयपाकाला सुरुवात केली की, हा चित्रकार बांबूच्या पोकळ नळीत बरचंस मिठ घालून तयार राही, आणि विणकराची बायको चुलीवर आमटीच पातेलं ठेवून कारणपरत्वे पुढल्या खोलीत गेली रे गेली की, तो त्या भगदाडातून बांबूची नळी आरपार घालून व आतल्या बाजुने त्या नळीला जोराची फ़ुंक्र मारुन ते सर्व मीठ आमटीत टाकी. मग तो ती नळी पटकन आतल्या बाजुला ऒढून घेई. त्या चित्रकाराला हा प्रयोग तीन दिवस करावा लागला.

आमटी खारटं झाली म्हणून त्या विणकराने आपल्या बायकोला साध्या शिव्या दिल्या. दुसर्‍या दिवशी पुन्हा आमटी खारट झाली म्हणून त्याने अगदी भारीतल्या भारी शेलक्या शिव्या दिल्या. पण तिसर्‍या दिवशीही आमटी आणखी खारट झाली असल्याचे पाहून जेव्हा रागाच्या भरत तो त्याच्या बायकोला मारायला गेला, तेव्हा तो चित्रकार पटकन तिथे जाऊन म्हणाला, अरे तू माणूस आहेस की कोण आहेस, दिवसभर स्वयंपाक, तुझी व मुलांची सेवा करणार्‍या बायकोला तू जर रात्र रात्र जागायला लावून हातमाग चालवयला सांगतोस, तर पुरेशा झोपेच्या अभावी तिच्या हातून आमटीत जादा मीठ पडेल नाहीतर काय होईल ? तू जागून पाहा ना एक दिवस ?’

चित्रकाराच्या या म्हणण्याला तोवर तिथे जमलेल्या इतर शेजार्‍यांनीही हार्दिक पाठिंबा दिला. त्यामूळे लज्जीत झालेल्या त्या विणकराने त्या दिवसापासून बायकोला रात्री हातमाग चालवायला सांगण्याचे बंद केले. साहाजिकच त्या चित्रकाराला तिथून पुढे गाढ निद्रेचे सुख मिळू लागले.

मात्रा अशी लागू पडाली

इंग्लडमध्ये त्या वेळी चोर व दरोडेखोर यांनी अगदी उच्छाद मांडला होता. रस्त्याने जाण्यार्‍या स्त्रियांच्या अंगावरचे अलंकारही चोर हिसकावून, पळवून नेत. पोलिस बंदोबस्त वाढवला गेला होता पण अंगावर अलंकार घालून रस्त्याने जाणार्‍या प्रत्येक बाईला पोलिस संरक्षण देणे शक्य नव्हते. म्हणून त्या वेळच्या चार्ल्स राजाने फ़र्मानं काढले, रस्त्याने जाणार्‍या कुणाही बाईने अलंकार घालू नये.

पण श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची सोस असलेल्या बर्‍याच बायका राजाज्ञा न जुमानता, अंगावर दागिने घालून रस्त्याने जाऊ जागल्या व चोर आणि दरोदेखोर यांचे लक्ष बनू लागल्या.

अखेर चार्लस राजाने दुसरे सुधारित फ़र्मान काढले ते पुढीलप्रमाणे; “रस्त्याने जाताना कुणाही स्त्रीने अंगावर अलंकार घालू नयेत. अर्थात वेश्या, कलावंतिणी व वाईट चालीच्या बायांना हा नियम न पाळण्याची मुभा देण्यात येत आहे”. राजा चार्ल्सच्या या सुधारित फ़र्मानाचा अतिशय चांगला परिणाम झाला.

आपण अलंकार घालून रस्त्याने जाऊ लागलो, तर आपली गणना वाईट स्त्रियात होईल, अशा भीतीने चांगल्या स्त्रियांनी तर अलंकार घालून रस्त्याने जाताना दागिने घालायचे बंद केलेच, पण वेश्या व कलावंतीणी यांनीही आपल्या हीन व्यवसायाची सर्वत्र जाहिरात होऊ नये, म्हणून रस्त्याने जाताना दागिने घालायचे सोडून दिले. पोलिसांवर पडणारा कामाचा ताण बराच कमी झाला.

दैवी शक्तीचा माणूस

एडवर्ड ड्रीपर कोप हा अमेरिकेतील एक गृहस्थ वन्य जमातींच्या रितीभातींचा अभ्या करण्यासाठी एकदा दूरवरच्या निवीड वन्यक्षेत्रात गेला असता, तिथे राहणाऱ्या त्या नरभक्षक रानाटी लोकांनी त्याला गराडून टाकलं.

स्वच्छ व चांगला उमदा माणूस आजा आपल्याला खायला मिळणार या आनंदाने ते त्याच्याभोवती भयानक हावभाव करीत नाचू लागले असता एडवर्डला आपला मृत्यू समोर येऊन ठाकलेला दिसू लागला. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली व त्याने आपल्या तोंडातली वरची खालची कृत्रिम दातांची कवळी हाताने बाहेर काढून व ती त्या रानटी लोकांपुढे धरुन, पुन्हा होती तशी बसविली.

त्या रानटी लोकांनी कवळी कधी पाहिली नसल्याने, त्यांना तोंडातले वरचे खालचे दात काढून पुन्ही ते जसेच्या तसे बसविणारा एडवर्ड हा कुणीतरी दैवी शक्तीचा माणूस असावा असे वाटले. याला आपण मारुन खाल्ले, तर आपल्यावर देवाचा कोप होईल, अशा समजुतीने त्यांनी त्याला बळी देण्याचा बेत रद्द केलाच, पण त्याला फ़ळे मुळे देऊन त्याला हवी ती माहिती धेऊन परत सुखरुप जाऊ दिले.

माझा हेतू वेगळा आहे

सुप्रसिध्द इंग्लिश नाटककार बर्नाद षॉ याच्याकडे एक फ़ालतू कवी गेला आणि त्याला आपलय रटाळ कविता वाचून दाखवू लागला. त्याच्या चारपाच कंटाळवाण्या कविता ऎकून होताच, षॉ याने जागेवरुन उठून आपल्या खोलीच्या सर्व खिडक्या धाढाधडा उघडल्या.

त्या प्रकरानं खूश झालेल्या त्या उथळ कवीनं आजूबाजूच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना ऎकू जाव्यात, म्हणून तुम्ही खिडक्या उघडल्यात का ? शॉ म्हणाला, छे छे ! शेजाऱ्यांशी माझे असलेली चांगले संबंध मला तसेच कायम ठिकवायचे आहेत. मग मी तुमच्या कवीता त्यांना कशाला ऎकवू ? मला जेव्हा झोप घयवीशी वाताते तेव्हा नेहमीच मी खिडक्या उघड्या ठेवतो.

शॉचे हे उत्तर ऎकून तो कवी लगोलग आपले कवीतांच्या बाडासह तिथून अंतर्धान पावला.