Category Archives: सामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान | General Knowledge

जुना गोवा

जुना गोवा

जुना गोवा

मांडवी नदीमुखाच्या तीरावर जुना गोवा वसला आहे.

जुना गोवा : हे शहर मांडवी नदीमुखाच्या डाव्या किनाऱ्यावर आहे.

गोव्याची राजधानी पणजी आहे.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून दक्षिणेला ४०० कि.मी. वर असलेल्या गोव्याच्या सरहद्दी महाराष्ट्र, कर्नाटक व अरबी समुद्र यांना भिडतात.

कच्छचे रण

कच्छचे रण

कच्छचे रण

फ्लॅमिंगो पक्ष्यांची भारतातील सर्वात मोठी जननभूमी कच्छचे रण आहे.

कच्छचे रण:- हे रण पाकिस्तानच्या सीमेलगत असून जवळजवळ सर्व गुजरात राज्यातच आहे.

त्याचे क्षेत्रफळ १८,००० चौ.कि.मी.आहे.व याचे छोटे रण कच्छच्या ईशान्य भागामध्ये,कच्छच्या आखातालगतच गुजरातेत असून त्याचे क्षेत्रफळ ५,१०० चौ.कि.मी.आहे.

गोवळकोंडा

गोवळकोंडा

गोवळकोंडा

दख्खनच्या पाच मुस्लिम राज्यांपैकी कुतुबशाहीची राजधानी (इ.स.१५१२ ते १६८७ या कालावधीत) गोवळकोंडा या ठिकाणी होती.

गोवळकोंडा:  हे शहर हैदराबादच्या पश्चिमेला ८ कि.मी.वर उत्तर आंध्र प्रदेशात आहे.

औरंगजेबाने गोवळकोंड्याची कुतुबशाही इ.स.१६८७ मध्ये उलथून ते राज्य मोगल साम्राज्यास जोडले.

(मोगल साम्राज्य इ.स.१५२६ ते १८५७) गोवळकोंडा नजीकच्या डोंगरामधील कॉंग्लोमीरत खडकांमध्ये सापडणार्‍या हिर्‍यांसाठी प्रसिद्ध होते.

सेल्युलर कारागृह

सेल्युलर कारागृह

सेल्युलर कारागृह

‘सेल्युलर’ कारागृह (कोठड्यांचे कारागृह) अंदमान-निकोबार बेटे येथे आहे.

अंदमान-निकोबार बेटे:-हे बेटे केंद्रशासित असून ते बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आहे.पोर्ट ब्लेअर ही त्याची राजधानी आहे.

या प्रसिद्ध कारागृहात वीर विनायक दामोदर सावरकर यांना इ.स. १९११ ते ३७ या कालावधीत जन्मठेपेची शिक्षा भोगण्यास बंदिस्त केले होते.

या कारागृहास इ.स.१९७९ मध्ये राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला.

प्लासी

प्लासी

प्लासी

प्लासी खेड्यामधील लढाईमधून ब्रिटिश साम्राज्याचा बंगालमध्ये चंचुप्रवेश झाला.

प्लासी: बंगालच्या नबाब सिराज-उद्दौला व ईस्ट इंडिया कंपनीचा सेनापती रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यात इ.स.१७५७ मध्ये प्लासी येथे युद्ध झाले.

या युद्धाचे स्मारक भागिरथी किनारीच्या युद्धभूमीवर आहे.

परंतु नदीने प्रवाह बदलत्याने ते अर्धे वाहून गेले आहे.

आसाम

आसाम

आसाम

इ.स. १८२६ मधील ब्रिटिशांबरोबर केलेया ‘यंडाबो’ करारानंतर ब्रह्मदेशाने सोडून दिलेला आधुनिक भारतातला प्रदेश आसाम होय.

आसाम:- म्यानमारमधील अशांतीमुळे त्यांनी इ.स.१८१७ मध्ये आसामवर स्वारी केली.

इ.स. १८२६ मध्ये ब्रिटिशांनी म्यानमार हल्लेखोरांना पळवून आसामचा भाग ब्रिटिश भारतास जोडला व इ.स.१८४२ मध्ये संपूर्ण आसाम ब्रिटिशांना मिळाले.

लक्षद्वीप बेटे

भारतामध्ये ‘नाईन डिग्री चॅनल’ लक्षद्वीप बेटे येथे आहे.

लक्षद्वीप बेटे

लक्षद्वीप बेटे

लक्षद्वीप बेटे: काव्हारट्टी हे या बेटांची राजधानी आहे.

मिनिकॉय बेट हे दक्षिणेला असून उत्तरेच्या अमिनदिवी वलकदिवीपासून नऊ अंश प्रवाहाने वेगळे काढले आहे.

कलदीवी,मिनिकॉय व अमिनदीवी नावाचा हा द्वीपसमूह अरबी समुद्रातील २७ बेटांचा बनला आहे.

यापैकी फक्त १० बेटांवर मनुष्य वस्ती असून जमिनीचे क्षेत्रफळ ३२ चौ.कि.मी.आहे.

मदुराई

मदुराई

मदुराई

पंड्या राज्याची (इ.स. ४ ते ११) मदुराई राजधानी होती.

मदुराई:- हे शहर दक्षिण-मध्य तामिळनाडूमध्ये वैगाई नदीकाठचे होय. हे शहर अनाई लागा व पासू (हत्ती,नाग व गाय) टेकड्यांनी वेढलेले आहे.

मीनाक्षी सुंदरेश्वर देवालय जगप्रसिद्ध आहे. इ. स. १३१० मध्ये जमीनदोस्त करण्यात आलेले हे देवालय तिरुमला नायक राजवाडा,टेप्पाकुलम (मातीची पाण्याची टेकडी) व १००० खांबी दिवाणखाना यांचा जिर्णोद्धार विजयनगर काळात (सोळाव्या व सतराव्या शतकात) करण्यात आला.

नालंदा विद्यापीठ

नालंदा विद्यापीठ

नालंदा विद्यापीठ

चिनी प्रवासी ह्युएन त्संग याने नालंदा बौद्ध केंद्राचा अभ्यास केला.

नालंदा:- सुप्रसिद्ध बौद्ध धर्मपीट,बहुतेकदा विद्यापीठ म्हणून उल्लेखिले जाते.

उत्तर बिहारातील नालंदाची परंपरा बुद्धकाळापर्यंत आणि महावीर काळापर्यंत पोहोचते.

सातव्या शतकात कनोजचा सम्राट हर्षवर्धन याच्या कारकीर्दीत चिनी प्रवासी ह्युएन त्संग नालंदामध्ये राहिला व त्याने विद्यापीठाच्या शिक्षणावर तसेच एकूण जनसंस्कृतीबद्दल लिहून ठेवले.

जयपूर

इ.स. १७२७ मध्ये महाराजा सवाई जयसिंग यांनी जयपूर शहराची स्थापना केली.

जयपूर:

जयपूर

जयपूर

जयपूर संस्थान बाराव्या शतकात रजपूत राजांनी स्थापिले होते.

ह्या शहराच्या दक्षिण सोडून सर्व बाजूंना टेकड्या आहेत त्यामुळे हे शहर नैसर्गिक तटबंदीचे शहर आहे येथील इमारती मुख्यतः गुलाबी संगमरवराच्या असल्यामुळे या शहरास गुलाबी शहर असे म्हटले जाते.

जयपूर संस्थानाची पूर्वीची राजधानी अंबर नंतर बदलून जयपूरला आणली गेली. सौंदर्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या जयपूरचा आराखडा सरळ रेघांवर आधारलेला आहे.