Category Archives: पाककला

पाककला | पाककृती | Maharashtrian Recipes | Marathi Food | Marathi Cuisine

उपवासाचा बटाटा वडा

साहित्य:
सारण :

 • १ किलो उकडलेले बटाटे
 • १ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले
 • आले
 • हिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)
 • बारीक कापलेली कोथिंबीर
 • चवीप्रमाणे मीठ
 • साखर
 • एक चमचा लिंबू रस
 • दाण्याचा कुट
 • खवलेला ओला नारळ

कव्हर साठी :

 • राजगिरा पीठ
 • शिंगाडा पीठ
 • साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल)

कृती :

उपवासाचा बटाटा वडा

उपवासाचा बटाटा वडा

प्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.

नंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला.

नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.

एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.

त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तेल घालून तापवा.

तेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाका.

नंतर तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत. वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

चॉकलेट केक

चॉकलेट केक

चॉकलेट केक

साहित्य:

 • दीड कप मैदा
 • अर्धा कप कोको पावडर
 • एक कप पीठी साखर
 • २ अंडी
 • १/२ चमचा खायचा सोडा
 • १ कप ताजे दही
 • अर्धा कप वितळलेल लोणी
 • एक लहान चमचा व्हॅनिला इसेंस

कृती:

मैदा गाळून त्यात कोको पावडर व खायचा सोडा मिसळा. लोणी व अंड्याध्ये साखर घालून फेटा. त्यात दही मिसळा. आता यात मैदा थोडा-थोडा घालून मिसळत रहा. आता यात थोडेसे पाणी व एसेंस टाकून लाकडी चमच्याने हलवा. आता केक पॉट मध्ये तूप लावून मैदा लावा. मिश्रण पॉट मध्ये भरून ओव्हन मध्ये ३५० डिग्री फे. वर बेक करावे. केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करावे.

इंद्रधनुषी सॅलेड

इंद्रधनुषी सॅलेड

इंद्रधनुषी सॅलेड

साहित्य:

 • ४ काकडी
 • २ बीट
 • ४ गाजर
 • ४ मुळा
 • २ टॉमेटो
 • २ लिंबू
 • ७-६ सॅलेडची पाने
 • ४ हिरवी मिर्ची
 • १ लहान चमचा मीठ
 • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
 • १ लहान चमचा चाट मसाला

कृती:

बीट, २ मुळा, २ गाजर, किसून घ्या. काकडी लिंबू व टॉमेटो गोल चिरुन घ्या. आता उरलेला २ मुळा व २ गाजर लांब चिरा, एका डिशमध्ये सॅलेडची पाने सजवा मधोमध किसलेला मुळा, गाजर व बीट ठेवा. चारी बाजुला चिरलेला मुळा, गाजर, काकडी, लिंबू, टॉमेटो व हिरवी मिरची सजवा. वरून मीठ, मिरची व चाट मसाला टाकून सॅलेड तयार.

अंकुरित सॅलेड

अंकुरित सॅलेड

अंकुरित सॅलेड

साहित्यः

 • अंकुरित मूग
 • उकडलेले बटाटे
 • राई ची पावडर
 • मीठ
 • धण्याची पावडर
 • लिंबू
 • ताजी क्रीम

कृतीः

बटाट्यास कुस्करून घ्यावे. मूग व कोथंबीर वाटुन मिळवावे. मीठ धन्याची पावडर आणि राई पावडर वरून टाकावी. प्लेट मध्ये काढून चारी बाजुस क्रीम टाकावे. चेरी आणि टोमॅटो ने सजवावे.

टीप : थाळीत सजवताना आपल्या मनाप्रमाणे आकार द्यावा.

धणे-जिरे कसाय

धणे-जिरे कसाय

धणे-जिरे कसाय


साहित्य :

 • १०० ग्रॅम धणे
 • ५० ग्रॅम जिरे
 • २ कप दूध
 • ८ चमचे साखर

कृती :

धणे व जिरे वेगवेगळे थोडेसे भाजून घ्यावेत. धने-जिरे एकत्र करून मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यावी. ही दळलेली पूड कसायकरिता वापरावी.

कसाय :

एका भांड्यात २ कप पाणी व २ कप दूध घेऊन ते एकत्र करून गरम करावयास ठेवावे. त्यात ८ चमचे साखर घालावी व चार चमचे धणे-जिरा पूड घालून हे मिश्रण उकळी येईपर्यंत तापवावे. थंड अथवा गरम सर्व्ह करावे.

भाज्यांचे लोणचे

भाज्यांचे लोणचे

भाज्यांचे लोणचे

साहित्य :

 • फ्लॉवरचे तुरे १ वाटी
 • सलगमचे साल काढून तुकडे १ वाटी
 • गाजर १ वाटी तुकडे
 • कांदा १
 • आले-लसूण बारीक चिरून २ टे.स्पून
 • तिखट
 • मीठ
 • गरम मसाला चवीनुसार
 • मोहरी पूड २ टी स्पून
 • व्हिनेगर २ टे.स्पून
 • साखर किंवा गूळ १/२ वाटी
 • मोहरी तेल २ टे.स्पून

कृती :

भाज्या उकळत्या पाण्यात दोन मिनिटे शिजवून चाळणीवर ओताव्यात. कापडावर पसरून पूर्ण कोरड्या कराव्यात. कांदा किसावा. गूळ व व्हिनेगर एकत्र करून मंद गॅसवर मधाप्रमाणे होईपर्यंत उकळावे. गार करावे. तेल तापवून कांदे किस, लसूण, आले परतावे. लालसर झाले की उतरवून त्यात मीठ, मोहरी पूड, तिखट व गरम मसाला एकत्र करावा. बरणीत भरून पुन्हा थोडं तेल घालावं. हे लोणचे उन्हात ठेवूनही करतात. कांदे ऐच्छिक आहे. आपल्याला मोहरीऐवजी शेंगदाणा तेल व लोणच्याचा मसाला वापरून हे लोणचे करता येते. लिंबूरस घालून तात्पुरते लोणचे छान लागते.

पांढरे कांदे व कैरीचे लोणचे

पांढरे कांदे व कैरीचे लोणचे

पांढरे कांदे व कैरीचे लोणचे

साहित्य :

 • २ वाट्या पांढरे कांदे उभ्या फोडी
 • ३ वाट्या कैऱ्या उभ्या फोडी
 • मीठ
 • तिखट
 • साखर चवीनुसार
 • हळद

कृती :

कांद्याच्या व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात. त्यात मीठ, तिखट, साखर व हळद घालावी. बरणीत भरून दर दोन दिवसांनी हलवावं. छान रस सुटतो तेलाशिवाय केलेले लोणचे चवीला छानही लागते.

ओल्या काजूची भाजी

ओल्या काजूची भाजी

ओल्या काजूची भाजी

साहित्य :

 • पाव किलो सोललेले ओले काजूगर
 • २ कांदे
 • २ बटाटे
 • १ टोमॅटो
 • अर्धा ओला नारळ किसून
 • लसुण
 • आले
 • गरम मसाला पावडर
 • तिखट
 • हळद
 • मीठ
 • कोथिंबीर
 • तेल

कृती :

काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत. नंतर भाजलेल्या कांदा – खोबर्‍याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ्या आण्याव्यात. उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.

तीळाचे लाडू

तीळाचे लाडू

तीळाचे लाडू

साहित्य:

 • २५० ग्रॅम तीळ
 • ५०० ग्रॅम खवा
 • ५०० ग्रॅम पीठी साखर
 • अर्धा चमचा वेलची पावडर

कृती:

तीळ साफ करून कढईत भाजा. हलका गुलाबी रंग झाल्यावर गॅस बंद करा.

हलक्या हाताने कुटून घ्या. कढईत खवा भाजू घ्या.

थंड झाल्यावर त्यात पीठी साखर , तीळ व वेलची पावडर मिसळून लाडू वळून घ्या.

मिरचीचे लोणचे

मिरचीचे लोणचे

मिरचीचे लोणचे

साहित्य :

 • १ किलो लांबट हिरवी मिरची
 • २ वाट्या मोहरीची डाळ
 • अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड
 • दीड चमचा हळद
 • चमचे हिंग
 • २॥ ते ३ वाट्या मीठ
 • १२ लिंबांचा रस
 • १ वाटी तेल

कृती :

एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे. धूर दिसेपर्यंत तापले की परातीतल्या जिनसांवर ओतावे व झार्‍याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा.

मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे. मिरची यंत्रात बारीक केली तरी बिघडत नाही. त्यात ४ चमचे वगळून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दु्सर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी बारा लिंबचा रस काढून लोणच्यात घालावा.

लिंबाच्या साली फेकून देऊ नयेत. सालीचेही चवदार लोणचे बनवता येते.