Category Archives: चटण्या

चटण्या | Chutney recipes

कोथिंबीरची चटणी

साहित्य:

  • २५० ग्रॅम कोथिंबीर
  • थोडासा पुदीना
  • १ कांदा
  • ३-४ पाकळी लसूण
  • ३ हिरवी मिरची
  • १ तुकडा आले
  • १ छोटीशी चिंच
  • थोडा गुळ
  • १ चमचा शेंगदाणा
  • मीठ चवीप्रमाणे

कृती:

कोथिंबीरची चटणी

कोथिंबीरची चटणी

कोथिंबीर व पुदीना निवडून. धुऊन घ्या.

कांदा, लसूण व आले सोलून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.

शेंगदाणे भाजून सोलून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधे चटणी पिसून घ्या.

तयार आहे कोथिंबीरची चटणी.