साहित्य :
- चिकन
- कांदा
- दालचिनी
- काळी मिरी
- मीठ
कृती :

चिकन सूप
चिकन घ्यावे. स्वच्छ धूवून तुकडे करून त्यातलेच अर्धे घ्यावे.
४ कप पाण्यात एका लहान कांद्याचे तुकडे, चिकन, लहानसा दालचिनीचा तुकडा, ४-५ काळी मिरी टालावी. चांगले तासभर चिकन शिजू द्यावे.
नंतर सूप गाळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ टाकावे.
थंड झाल्यावर वरती चरबी येईल ती काढून टाकावी व नंतर पुन्हा गरम करुन सर्व्ह करावे.
आजारी किंवा लहान मुलांना देण्यास योग्य.